Khed : खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे ४२ लाख ७५ हजारांचे नुकसान

खेड : तालुक्यात गेल्या महिन्यात सलग १० ते १२ दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. १,७०२ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून तब्बल ४२ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एकूण ५०३ हेक्टर क्षेत्रातील भातपिके बाधित झाल्याचे कृषी विभागाने नोंदवले आहे. दिवाळीच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील भातपिके आडवी झाली. काही ठिकाणी कापणी झालेला भात पावसात भिजल्याने कुजून गेला. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे धान्य वाया गेले असून, आर्थिक नुकसान वाढले आहे. कृषी विभागाच्या पथकांकडून बाधित क्षेत्रांचा पंचनामा सुरू असून, शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 10/Nov/2025