चिपळूण : मुंबईकडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद केले जातात. त्यामुळे चिपळूणमध्ये आरक्षणाचे तिकीट असणाऱ्या प्रवाशांनासुद्धा आतमध्ये बसता येत नाही. त्यामुळे आरक्षित केलेल्या लोकांचे पैसे नाहक फुकट जात आहेत. याची चौकशी व्हावी व रेल्वे डब्यांचे दरवाजे आतून बंद करणाऱ्यांवर रेल्वे आर.पी.एफ. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे आरपीएफ रेल्वे डब्यांमध्ये चिपळूण रेल्वे स्थानकावर जागरूकता मोहीम राबवली.
प्रवाशांना सुरक्षित आणि कायदेशीर प्रवास पद्धतींबद्दल जागरूक करण्यात आले. चिपळूणमध्ये ट्रेनमध्ये आरक्षण तिकिटे असतानाही प्रवाशांना जागा नाकारल्या जात असल्याबद्दल अनधिकृत व्यक्तींकडू राखीव जागांवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे याबाबत तक्रारी होत्या खेड मध्येदेखील याबाबत प्रकार घडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुकादम यांनी ही तक्रार केली होती.
चिपळूणमध्ये अनेकवेळ एक्स्प्रेस गाड्यांचे डबे उघडले जात नव्हते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता या पार्श्वभूमीवर आता रेल्वे पोलिस सतर्क झाली आहे. प्रवाशांनी असे प्रकार घडल्यास स्टेशनवर किंव अधिकृत माध्यमांद्वारे रेल्वे संरक्षण दलाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन मुकादम यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 10/Nov/2025













