देवरूख : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत राज्यातील ज्या ग्रामपंचायतीला इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना इमारत देण्याची योजना शासनाने अंमलात आणली आहे. या अंतर्गत लांजा, राजापूर तालुक्यामधील ६ ग्रामपंचायतींसाठी निधी आमदार किरण सामंत यांनी मंजूर केला आहे.
आमदार किरण सामंत व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील आजिवली (२० लाख), दोनिवडे (२० लाख), वडदहसोळ (२५ लाख), लांजा तालुक्यातील खोरनिनको (२० लाख), मठ (२५ लाख), तर साखरपातील देवडे (२० लाख) या ६ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधणीसाठी निधी मंजूर झाला आहे.
काही महिन्यांतच या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार असून त्यातून प्रशासकीय कारभार चालणार आहे. याबद्दल नागरिकांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले. या योजनेंतर्गत मतदारसंघात सुमारे १ कोटी ३० लक्ष इतका निधी आमदार किरण सामंत यांनी मंजूर केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 10/Nov/2025













