गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील मुख्य बाजारपेठेपासून धावडेवाडीकडे जाणारा रहदारीचा रस्ता तीव्र चढ-उताराचा आहे. या रस्त्याच्या तीव्र उतारात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले होते. तसेच अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर खडीचे थर साचले होते. मात्र कुणीही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष न दिल्याने अखेर सामाजिक बांधिलकीतून मालगुंड बाजारपेठेतील रिक्षा संघटनेने श्रमदान करून या रस्त्याची डागडुजी केली आहे.
याच रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी धावडेवाडी परिसरातील एक दुचाकीस्वार घसरून पडल्यामुळे त्याच्या हाताला किरकोळ मार लागला होता. तसेच मालगुंड बाजारपेठेतून धावडेवाडीकडे जाणारी लहान मोठी वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून सुरू असते. एकूणच धावडेवाडी येथील ग्रामस्थांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठ अत्यंत सोयीस्कर आहे, परंतु या रस्त्याची दुर्दशा झालेलं असताना हे काम बांधकाम प्रशासनाने केले पाहिजे होते तसेच मालगुंड ग्रामपंचायत किंवा मालगुंड येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुर्दशेकां गांभीर्याने लक्ष देण्याची गरज होती. मात्र कुणीही रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष न दिल्याने अखेर या रस्त्याची रिक्षा संघटनेने श्रमदान करून रस्त्याची डागडुजी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 11/Nov/2025













