Ratnagiri : मिरकरवाडा समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी : शहराजवळील मिरकरवाडा समुद्रात मासेमारी करत असताना खलाशाच्या छातीत दुखू लागल्याने तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

जागुराम जितुराम चौधरी (वय ४९, रा. गाव चौमाला, जि. कैलाली, नेपाळ, सध्या : मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) दुपारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी हे रुकसाना अमिरूद्दीन भाटकर यांच्या मालकीच्या अकीफ दानिश बोटीवर खलाशी म्हणून कामाला होते.

शनिवारी (ता. ८) पहाटे अकीफ दानिश या बोटीने मासेमारी करण्यासाठी खलाशी व तांडेल, असे मिरकरवाडा खोल समुद्रात मासेमारी करत असताना जागुराम चौधरी यांच्या छातीत दुखू लागले. तत्काळ त्यांना मिरकरवाडा जेटी-२ येथून रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 11/Nov/2025