Ratnagiri : बर्फ फॅक्टरीच्या पडीक इमारतीजवळ गोवा बनावटी मद्यविक्रीवर छापा

रत्नागिरी : शहरातील खालची आळी येथे बंद पडलेल्या बर्फ फॅक्टरीच्या पडीक इमारतीजवळ विनापरवाना गोवा बनावटीची मद्यविक्री करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू सोमवंशी (वय २३, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिरमागे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सायंकाळी निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा गोवा बनावटीची मद्यविक्री करत असताना सापडला. त्याच्याकडील एकूण ४ हजार ४८० रुपयांची गोवा बनावटीचे मद्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल राकेश बागुल यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 18/Nov/2025