Lok Adalat | रत्नागिरीत १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय आदी ठिकाणी या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदातलतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबीक वाद, चेक बाऊंस, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणा अंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतचा लाभ नागरिकांनी घ्यावा व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, व्ही. वाय. जाधव अध्यक्ष यांनी केले आहे.

पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्याकरिता आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 20/Nov/2025