Ratnagiri : दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेने स्व-उत्पन्नातून दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखून ठेवलेल्या ५ टक्के निधीतून वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग टक्के निधीतून वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज लाभार्थ्यांनी, पालकांनी, समुपदेशन तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्रांनी कार्यालयाकडून अर्ज प्राप्त करुन घेऊन आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव आपल्या क्षेत्रातील गटविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 20/Nov/2025