देवरुख : शहरातील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयात स्व. शालिनी व स्व. सदानंद बेंदरकर स्मृतिप्रित्यर्थ आयोजित खुल्या कथालेखन स्पर्धेत प्रा. रेखा नाबर (माहीम-मुंबई) यांनी प्रथम, नंदकुमार पंडित (वडेर सांगली) यांनी द्वितीय, अमित पंडित (कनकाडी-देवरुख) व प्रतीक्षा हरिपूरकर (चिंचवड-पुणे) यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तसेच राजलक्ष्मी सुर्वे (रत्नागिरी), प्राची राव (देवरुख), विनिता रोठे (बंगळुरू), मोहन कुलकर्णी (अंबरनाथ), प्रशांत पुंडलिक (शिरुडे-डोंबिवली), डॉ. राजेंद्र बावळे (राजापूर) व रवीना घाणेकर (आडीवरे) यांच्या कथांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
या कथा स्पर्धेसाठी संभाजीनगर, लोवले – संगमेश्वर, सातारा, सांगली, अंबरनाथ, चिंचवड – पुणे, डोंबिवली, रत्नागिरी, देवरुख, बडोदा, ठाणे, कोल्हापूर, पिंपळी खुर्द-चिपळूण, नेरूळ नवी मुंबई, माहीम-मुंबई, चिपळूण, माखजन, कोळकेवाडी, जांभूळ आड, पुणे, जोगेश्वरी, हातखंबा, इंदोर, नवी मुंबई, कोंडगाव, साखरपा, भाईंदर, राजापूर, नागपूर, चिखली – संगमेश्वर, खडकपाडा-कल्याण, आडीवरे, कनकाडी- देवरूख, बंगळुरू, धायरी-पुणे इत्यादी ठिकाणच्या एकूण ४० स्पर्धकांनी पाठविल्या होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 20/Nov/2025














