राजापूर : मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह होत चालला आहे आणि त्याचाच थेट फटका आता निष्पाप जनावरांच्या जीवावर राजापूर प्रांत कार्यालयासमोरील पुलावर वाहनाने धडक दिल्याने एका घटनास्थळी हळहळ व्यक्त होत उठला आहे. नुकताच सायंकाळी बैलाचा जागीच मृत्यू झाला. असताना, या प्रकरणाने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे.
तहसील अलीकडेच कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर समित्या स्थापन करण्याचे, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करण्याचे तसेच गुरांच्या मालकांवर कायदेशीरकारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी दिलेले आदेश प्रत्यक्षात जमिनीवर येतच नाहीत. आदेश कागदावर आणि फाइलमध्येच अडकून राहतात; प्रत्यक्ष अंमलबजावणी ‘केराच्या टोपलीत’ गेली आहे, असे जनतेतून सरळ आरोप होत आहेत.
गटविकास अधिकारी यांनी वेळोवेळी पाठवलेला पत्रव्यवहार, सूचना आणि आदेश ग्रामपंचायत स्तरावर पोहोचायलाच तयार नाहीत. ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांना या विषयाचे मोकाट कोणतेही गांभीर्य नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही, गुरांच्या मालकांवर कोणतीही कारवाई होत नाही आणि त्याचा परिणाम अनेक निष्पाप जनावरांचे बळी जात आहेत. आणखी किती जीव जाणार? हा चटका देणारा सवाल सर्वत्र उपस्थित आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 21-Nov-2025














