Breaking: मोठी राजकीय खळबळ! काँग्रेसही सोडणार रत्नागिरीत उबाठाची साथ? नगर पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठा ट्विस्ट!

रत्नागिरी (Ratnagiri Political News):
रत्नागिरीच्या राजकारणात (Ratnagiri Politics) आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘महाविकास आघाडी’ला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष (Congress) देखील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे – UBAT) गटाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसची ‘एक्झिट’
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी (Ratnagiri Nagarpalika Election) नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकून आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. यामुळे महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण होतेच. त्यातच आता काँग्रेस पक्षही उबाठा गटासोबतची आघाडी तोडण्याच्या मार्गावर आहे.

या संदर्भात थोड्याच वेळात होणाऱ्या अधिकृत पत्रकार परिषदेत (Press Conference) मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

उबाठा गट रत्नागिरीत एकाकी पडणार?
राजकीय वर्तुळात आता या घडामोडींमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेसनेही साथ सोडल्यास, रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा (उबाठा गट) प्रवास एकाकी होण्याची शक्यता आहे.

या नव्या ट्विस्टमुळे रत्नागिरीतील नगर पालिका निवडणुकीचे समीकरण (Ratnagiri Election Equation) पूर्णपणे बदलणार असून, भाजप-शिंदे गटाला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 21-11-2025