राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तळ कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी कार्यान्वित असलेल्या पासपोर्ट कार्यालयातून गेल्या वर्षभरात ८,६२६ पासपोर्टची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती येथील पासपोर्ट कार्यालयातून देण्यात आली. दिवसेंगणिक या पासपोर्ट सेवा कार्यालयाचा जनतेला चांगलाच फायदा होत असून चांगली सुविधा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
तत्कालीन परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या माध्यमातून तळ कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी राजापूर पोस्ट कार्यालयात सन ऑगस्ट २०१८ साली पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आली. तेव्हापासून कोविड मधील काही काळ वगळता या पासपोर्ट सेवा केंद्राला चांगला प्रतिसाद लाभला आहे. गेल्या काही वर्षात अनेक नागरिकांनी या कार्यालयातून पासपोर्ट प्राप्त केले आहेत. जानेवारी २०२५ पासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत कार्यालयात ८,६२६ पासपोर्टची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती येथील पासपोर्ट सेवा केंद्रातून देण्यात आली.
या यापूर्वी पासपोर्ट नोंदणीसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या; मात्र केंद्र सरकारने तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करून दोन जिल्ह्यांतील नागरिकांची होणारी अडचण दूर केली आहे. मागील काही वर्षात पासपोर्ट संबंधी नागरिकांच्या अनेक अडचणी दूर झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 22-Nov-2025










