रत्नागिरी – रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला आज (मंगळवार) सकाळी उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या पहिल्या दीड तासांत (सकाळी ७:३० ते ९:०० वाजेपर्यंत) चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेळेत एकूण १०.५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
या आकडेवारीवरून रत्नागिरीतील मतदारांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे. सकाळी थंडीची वेळ असूनही मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
येत्या काही तासांत मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, नगरपालिकेसाठी मतदानाचा कोणता आकडा पार होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 02/Dec/2025














