चिपळूण संगमेश्वरातील १२ गावांत सौरपथदीप प्रकल्प

चिपळूण : चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये राबविण्यात आलेल्या सौर पथदीप प्रकल्पात नायशी ग्रामस्थांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल टीम जीआयआयपीएल, निर्मिती फाऊंडेशन आणि टीयूव्ही-एसयूडीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. नायशीमध्ये हा प्रकल्प कोणत्याही अडथळ्यांशिवाय आणि पूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्याचे संस्थांनी नमूद केले.
या प्रकल्पात सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी दाखविलेला लोकसहभाग, जबाबदारीची जाण आणि समन्वयाचे कौतुक सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान १२ गावांमधून ‘आदर्श गाव’ निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्प नियमांचे पालन, गावाकडून केलेले श्रमदान, लोकसहभाग, पूर्वतयारी, प्रचारासाठी लावलेले बॅनर्स आणि कुठलाही वाद न होता प्रकल्प सुरळीतरित्या पूर्ण करणे या प्रमुख निकषांवर निवड प्रक्रियेचे गुणांकन करण्यात आले.

या प्रकल्पांतर्गत सर्वोत्कृष्ट आदर्श गाव म्हणून आंबव पोंक्षे, उत्कृष्ट आदर्श गाव मांडकी, उत्तेजनार्थ म्हणून पालवण गावाचा गौरव करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट आदर्श म्हणून सरपंच शेखर उखार्डे (आंबव पोंक्षे), उत्कृष्ट आदर्श सरपंच चंद्रकांत वरवटकर (शिरंबे), उत्तेजनार्थ मेघ सावंत (तोंडली) व माजी सरपंच संजय मादगे (मांडकी), सर्वोत्कृष्ट आदर्श उपसरपंच मंगेश मांडवकर (आंबव पोंक्षे), उत्तम आदर्श उपसरपंच अनंत वरवटकर (पेढांबे), उत्तेजनार्थ म्हणून संदीप घाग (नायशी) व गणेश विचारे (पालवण) यांची निवड करण्यात आली.

तसेच आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून प्रकाश कदम (तोंडली/वडेरु), अभिजित चव्हाण (शिरंबे/आंबव), श्रीधर भागवत (आगवे), स्वप्नील घाडगे (पालवण) आदींचा गौरव करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 02/Dec/2025