सनागिरी : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागातील १ हजार ५९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समाययोजनेची प्रक्रिया ५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनाने या समायोजनेस स्थगिती दिली आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी नव्याने पत्र काढले आहे. त्यानुसार २०२५-२६ मधील संचमान्यता अंतिम झाल्यानंतर समायोजनेची प्रक्रिया
राबविण्याची सूचना दिली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या व समायोजनाच्या आदेशाला संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते. पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
शासनाचा निर्णय कायम ठेवला. न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने शिक्षकांची समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे. सन २०२४-२५ मधील पटसंख्येनुसार समायोजन करण्यात येणार होते. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मात्र शासनाने दि. २९ नोव्हेंबर रोजी नव्याने पत्र काढले आहे. त्यामध्ये त्यांनी २०२५-२६ मधील संचमान्यता अंतिम झाल्यानंतर समायोजन करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे ५ डिसेंबरपर्यंत होणाच्या समायोजन प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. २०२५-२६ ची संचमान्यता अंतिम झाल्यानंतर समायोजन होणार आहे.
या नव्या सूचनेमुळे अतिरिक्त शिक्षक संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते. समायोजनाच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये मात्र अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समायोजनेमुळे अनेक शिक्षकांना आता शाळा, गाव आणि तालुका सुद्धा सोडावा लागणार आहे. तसेच कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्यास संबंधित शाळेतील विद्याथ्यांना दूर अंतरावरील शाळेत जावे लागणार आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्याचा धोका आहे. तसेच नव्याने शिक्षक भरती सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिक्षक होण्याची आशा लावून बसलेल्या तरुण-तरुणीना नैराश्य येणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
समायोजनेची अशी प्रक्रिया होणार
समायोजनेसाठी सध्या शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सेवा ज्येष्ठता यादी तयार केली जाईल. त्याबाबत हरकती मागविण्यात येतील. योग्य हरकती असल्यास त्या मान्यही केल्या जातील. त्यानंतर समुपदेशनाद्वारे पात्रतेनुसार त्यांना नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात रिक्त जागा नसल्यास संबंधित शिक्षकांची यादी उपसंचालक विभागाकडे देण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 02/Dec/2025














