राजापूर : राजापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) मतदान झाले. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ‘काँटे की टक्कर’ येथे होणार आहे. गेल्या नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये झालेल्या राजकीय स्थित्यंतरामध्ये जुळलेली नवीन राजकीय समीकरणे आणि मतदानाचा वाढलेला टक्का याच्यातून मतदाराचा कौल नेमका कोणाच्या बाजूने राहणार? याची उत्सुकता आहे.
राजापूर पालिकेची यापूर्वी २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या आठ प्रभागातील सतरा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या वेळी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशा तिरंगी झालेल्या लढतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली होती. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. या वेळी झालेल्या निवडणुकीमध्ये राजापूर पालिकेची नवीन प्रभागरचना झाली आणि नगरसेवक, प्रभागांची संख्या वाढली आहे. त्यातून, दहा प्रभागातून वीस नगरसेवकांची निवड होणार आहे.
नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून, अनेक राजकीय स्थित्यंतरे आणि पक्षांतरे झाली. त्यामधून नवी राजकीय समीकरणे जुळली आहेत. या वेळची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. मतदानाचाही टक्काही वाढला आहे. त्यामुळे पालिकेमध्ये मतदार राजाचा कौल महाविकास आघाडी की, महायुती यापैकी नेमका कोणाच्या बाजूने राहणार? याची उत्सुकता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 04/Dec/2025












