खेड : दुचाकीच्या डिकीमधून ५० हजाराची रोकड लांबवली

खेड : शहरातील भाऊसाहेब पाटणे संकुलासमोर उभ्या केलेल्या एका दुचाकीच्या डिकीतून दोन अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. एका पतसंस्थेत दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने जमा केलेली. रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी डिकी उघडून रोकड असलेली बॅग काढून घेत पोबारा केला. दुचाकीवरून आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणातील पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 26/Oct/2024

Shanti real estate 1