रत्नागिरी : कळझोंडीतील धरणामध्ये राख मिसळण्याची भीती

Jun 25, 2024 - 15:54
Jun 25, 2024 - 15:57
 0
रत्नागिरी : कळझोंडीतील धरणामध्ये राख मिसळण्याची भीती

जाकादेवी : तालुक्यातील कळझोंडी येथे उघड्यावर टाकलेली राख पावसाळ्यात नदीनाल्यासह ओढ्यातून वाहत जवळच्या विहिरी किंवा धरण्याच्या पाण्यात मिसळण्याचा धोका आहे. टाकलेली राख उचलून टाकणे आवश्यक आहे, असे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे. कळझोंडी-गणेशवाडी येथे राखेचे पाणी कुंभवणेवाडी येथील विहिरीत व नदीमार्फत धरणाच्या पाण्यात जात आहे. कुंभवणेवाडी येथील विहिरीत व नदीत या सिमेंटच्या राखेचे थर साचलेले आहेत. या पाण्याचा रंग बदलला आहे. या भागात मोठा पाऊस पडला तर उघड्यावर टाकलेली राख नदीच्या पाण्यातून धरणात जाऊ शकते. कळझोंडी धरणातून जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेद्वारे परिसरातील १४ ग्रामपंचायत व २७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या परिसरातील राखेचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी येथील कळझोंडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, पांडुरंग सनगरे, महादेव आग्रे, किशोर पवार, वासुदेव घाणेकर, उद्योजक चित्तरंजन मुळ्ये यांनी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:22 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow