नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

Jul 5, 2024 - 16:09
 0
नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्ट 2024 ला दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल.

विद्यार्थी नीट पीजी परीक्षेचं नवं वेळापत्रक एनबीईची वेबसाईट natboard.edu.in वर पाहू शकतात. नीट पीजी परीक्षा ही नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार, नेट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली होती.

नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार नीट पीजी परीक्षेचं आयोजन 11 ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. यानंतर या परीक्षेची कट ऑफ डेट 15 ऑगस्टला जाहीर होईल. परीक्षेसंदर्भातील आणखी माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

इथं पाहा नीट पीजी परीक्षेबाबत पत्रक

नीट पीजीचं पत्रक कसं पाहणार?

स्टेप 1: विद्यार्थी सर्वप्रथम नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या अधिकृत वेबसाईटला natboard.edu.in भेट द्या.
स्टेप 2: आता नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या होमपेज वर तुम्हाला पब्लिक नोटीस ऑप्शन दिसेल.
स्टेप 3: पब्लिक नोटीस मध्ये तुम्हाला नीट पीजी परीक्षेसंदर्भातील पर्याय दिसेल.
स्टेप 4: विद्यार्थी त्यावर क्लिक करु शकतात.
स्टेप 5: यानंतर विद्यार्थ्यांना नवं पेज उघडलेलं पाहायला मिळेलं.
स्टेप 6: यानंतर विद्यार्थ्यांना नीट पीजी परीक्षेबाबत सूचनापत्रक पाहायला मिळेल.

नीट यूजी आणि नेट परीक्षेतील गोंधळामुळं नीट पीजी परीक्षा लांबणीवर

देशभरात पदवी स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट यूजी परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नेट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षेत देखील गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर 23 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. नीट यूजी आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षेचं आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून केलं जातं. या दोन्ही परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्यानंतर नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकली गेली होती. आता नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow