ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या हिना खानने केस कापले, आईला अश्रू अनावर

Jul 4, 2024 - 14:27
 0
ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या हिना खानने केस कापले, आईला अश्रू अनावर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समोर आले आहे.
 
किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती.

आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओसोबत हिनाने एक पोस्ट लिहिली आहे.
 
हिना तिचे हेल्थ अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता हिनाने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. कॅन्सरमध्ये केमोथेरपी दरम्यान केस गळत असल्याने हिनाने तिचे लांब केस कापले आहेत.


 
हिना या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे गेली. पण, व्हिडीओच्या शेवटी तिच्या आईला हे पाहावले नाही. लेकीला मिठीत घेत आईने भावनांना वाट मोकळी करून दिली.
 
हिना ही खुर्चीवर बसली आहे आणि तिच्या आईला रडू नकोस म्हणते. ती फक्त तिचे केस कापत आहे. ते पुन्हा येतील असे म्हणते. तुम्हीही तुमचे केस कापले आहेत आणि ते पुन्हा आले आहेत. तेही माझ्यासाठी पुन्हा येतील असे हिना आपल्या आईला समजावत आहे.
 
हिनाचा प्रियकर देखील हिनाच्या आईची समजूत घालतना आता तुम्ही रडू नका, असे म्हणतात. हिनाने हेअर ड्रेसरला सांगून हेअर स्टाईल शॉर्ट करते.
 
व्हिडीओच्या शेवटी हिना खूश होते. तिची आई, प्रियकर आणि टीमचे सदस्य हिनाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी टाळ्या वाजवतात. तर, हिनाची आई तिला मिठी मारते आणि भावनांना वाट मोकळी करून देते.
 
हिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'जे या आजाराशी लढत आहेत, विशेषत: महिला, ही सगळी लोक सुंदर आहेत. मला माहित आहे की हे कठीण पण कल्पना करा की तुमची लढाई इतकी अवघड असेल की तुम्हाला तुमचे केस, तुमचा मुकुट गमवावा लागेल? पण जर तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील...आणि मी जिंकणे निवडले आहे असे हिनाने म्हटले.आहे, मला माहित आहे की आपल्यापैकी काहींसाठी केस म्हणजे एखाद्या मुकुटासारखे आहेत, जे आपण कधीही काढत नाही.


 
पण कल्पना करा की तुमची लढाई इतकी अवघड असेल की तुम्हाला तुमचे केस, तुमचा मुकुट गमवावा लागेल? पण जर तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील...आणि मी जिंकणे निवडले आहे असे हिनाने म्हटले.
 
आपल्याच कापलेल्या केसांचा विग तयार करणार असून भविष्यात हा विग वापरणार असल्याचे हिनाने म्हटले. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 04-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow