UK Election 2024 : ब्रिटनमध्ये आज मतदान

Jul 4, 2024 - 12:20
Jul 4, 2024 - 16:21
 0
UK Election 2024 : ब्रिटनमध्ये आज मतदान

ब्रिटनमध्ये निवडणुकीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी मतदान सुरु झालं असून ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासमोर सरकार वाचवण्याचं आव्हान आहे. ब्रिटनची जनता ऋषी सुनक यांच्या 20 महिन्यांच्या सरकारला पुन्हा सत्ता देणार की विरोधकांना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि कंर्जव्हेटिव्ह पार्टीचे उमेदवार ऋषी सुनक यांना या निवडणुकीत तगडं आव्हान आहे. मागील 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंर्जव्हेटिव्ह पार्टीची सत्ता यावेळी धोक्यात असल्याचं दिसून येत आहे.

ब्रिटनमध्ये आज मतदान

निवडणुकीच्या आधीच्या कलांनुसार, ही निवडणूक कंर्जव्हेटिव्ह पार्टीसाठी कठीण गेल्याचं म्हटलं जात आहे. कलांनुसार, कंर्जव्हेटिव्ह पार्टीला यंदा विरोधी पक्ष लेबर पार्टीचं जोरदार आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे. ब्रिटनमध्ये 4 जुलैला मतदान पार पडत असून ब्रिटनची जनता नेत्यांच्या भविष्याचा निर्णय घेणार आहे. या निवडणुकीत ऋषी सुनक यांची टक्कर थेट लेबर पार्टीचे नेते केयर स्टारर यांच्यासोबत आहे.

ऋषी सुनक विरुद्ध केयर स्टारर

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष आणि विरोधी लेबर पार्टीचे केयर स्टारर यांच्यात मुख्य लढत असल्याचं सांंगितलं जात आहे. निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये लेबर पार्टी बहुमत मिळवण्याचा दावा करत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे नेतृत्व केयर स्टारर करत आहेत. ब्रिटनमध्ये पार पडत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

ऋषी सुनक 

कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, आतापर्यंत ज्या प्रकारची निवडणुकीचे कल हाती आले आहेत, त्यावरुन यावेळी त्यांचा विजयाचा मार्ग सोपा नसल्याचं म्हटलं जात आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनमधील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा दावा करत असले तरी अनेक आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यांनी दिलेली आश्वासने न पाळल्याने त्यांच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले आशियाई आणि हिंदू पंतप्रधान आहेत.

केयर स्टारर 

कामगार पक्षाचे नेते केयर स्टारर हे माजी मानवाधिकार वकील आणि मुख्य सरकारी वकील आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात लेबर पार्टीने बहुमत मिळवण्याचा दावा केला आहे. यामुळे केयर स्टारर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केयर स्टारर हे सार्वजनिक अभियोगांचे माजी संचालक आहेत. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी लेबर पार्टीत प्रवेश केला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow