ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन

Jul 4, 2024 - 17:01
 0
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन झालं आहे. अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांनी अभिनेते राज कपूर आणि देवानंद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे.

स्मृती विश्वास यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्मृती विश्वास यांचं महाराष्ट्रातील नाशिकमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. बुधवारी 3 जुलै रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी वयोमानाच्या त्रासामुळे बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करून अभिनेत्रीच्या निधनाची माहिती दिली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही दु:खद बातमी दिली असून गुरुवारी ख्रिश्चन पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री स्मृती विश्वास यांनी 1930 च्या दशकात फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नेक दिल', 'अपराजिता' आणि 'मॉडर्न गर्ल' या हिट चित्रपटामध्येही काम केलं. 1930 ते 1960 पर्यंतच्या तीन दशकांमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

हंसल मेहता यांनी श्रद्धांजली वाहिली

स्मृती विश्वास यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये 100 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर वृद्धापकाळाने त्यांचं 3 जुलै रोजी निधन झालं आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून स्मृती बिस्वास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी अभिनेत्रीचे काही फोटो शेअर केले आहेत.

वयाच्या 10 वर्षी बालकलाकार म्हणून सुरुवात

स्मृती बिस्वास यांनी वयाच्या 10 वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी 'संध्या' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केलं, ज्यामध्ये गुरु दत्त, व्ही शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बीआर चोप्रा आणि राज कपूर यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 04-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow