'इन्फिगो'तर्फे आज राजापूरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

Jun 26, 2024 - 10:06
 0
'इन्फिगो'तर्फे आज राजापूरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

राजापूर : राजापूर येथे प्रथमच इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या विद्यमाने बुधवारी (ता. २६) डॉ. जोशी हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये मोतीबिंदूतज्ज्ञ डॉ. प्रतिभा चाचडी शस्त्रक्रिया करणार आहेत. 

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणाऱ्यांनी नावनोंदणी केलेली आहे. या सर्व शस्त्रक्रिया बिनटाक्याच्या व लेझर फेको इमल्सिफिकेशन या सूक्ष्म पद्धतीने करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यात प्रथमच अशा पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. रुग्णांना रत्नागिरी किंवा अन्य ठिकाणी जाऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया कराव्या लागू नयेत म्हणून हॉस्पिटलने पुढाकार घेऊन प्रथमच मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे आयोजन केले आहे. या दिवशी ज्यांना शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांनी पूर्वनोंदणी केलेली आहे. पूर्वतपासणी व पूर्वनोंदणी केल्याशिवाय शस्त्रक्रिया करता येणार नाहीत, याची रुग्णांनी नोंद घ्यावी. शस्त्रक्रिया करायची आहे अशा रुग्णांनी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow