समुद्र किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती

May 28, 2024 - 16:56
 0
समुद्र किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती

सावंतवाडी : राज्य सरकार समुद्र किनारपट्टीवर ९०० कोटी खर्च करून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. तसेच कणकवली व सावंतवाडी शहरांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी आचारसंहिता शिथिल झाल्यावर त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री केसरकर म्हणाले, अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास सहकार्य करावे. आचारसंहितेनंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यात हा निर्णय घेतला जाईल. दोडामार्ग तालुक्यातील महालक्ष्मी कंपनीच्या वीज वितरणासाठी लाईन टाकताना शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले.

सावंतवाडी शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्यासाठी निधीही मंजूर झाला होता. मात्र तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर असताना ते काम केले नाही तेच आता बोलत आहेत, अशी टिका साळगावकर यांचे नाव न घेता केसरकर यांनी केली. मात्र आचारसंहितेनंतर सावंतवाडी व कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी प्रस्ताव तयार केले जाईल व शासनाला तो सादर करून मजुरी मिळवू असेही ते म्हणाले.

भगवतगीता पाठ, मनुस्मृतीबाबत चुकीच्या चर्चा

भगवतगीता पाठ, मनुस्मृती बाबतीत चुकीच्या चर्चा सुरू आहेत. शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही. समितीने प्रस्ताव सादर केला तो फुटला आणि चर्चा सुरू झाली आहे. खरे तर स्पर्धा परीक्षा, सीबीएससीमध्ये हे पाठ, श्लोक आहेत. विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी पाठ, श्लोक ठेवला आहे त्याबद्दल प्रत्येकाने खातरजमा करून घ्यावी, ती प्रस्तावना आहे असेही केसरकर यांनी सांगितले.

वीज वितरण बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कोकणामध्ये अतिवृष्टी होते असलेल्या ठिकाणी पावसाळ्यात वीज वितरण कंपनीला पायाभूत सुविधांची गरज आहे. पायाभूत सुविधा देताना कोकणासाठी वीज वितरण कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे. ही त्याच्या निदर्शनास आणून देण्यात येईल असे केसरकर यांनी स्पष्ट केले. वीज वितरणचे काम सुरळीतपणे व्हावे आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 28-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow