लांजा : पीएम किसान, नमो शेतकरी योजनांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा कृषी पर्यवेक्षक संघटनेचा इशारा

Jul 4, 2024 - 10:34
 0
लांजा : पीएम किसान, नमो शेतकरी योजनांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा कृषी पर्यवेक्षक संघटनेचा इशारा

पावस : पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याबाबत कृषी पर्यवेक्षक संघटनेतर्फे लांजा तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यात पीएम किसान योजना २०१९ पासून राबवण्यात येत आहे. सुरवातीला योजनेची अंमलबजावणी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार केली आहे. या योजनेचे सनियंत्रण सुरुवातीला महसूल विभागाकडे होते; परंतु महसूल विभागाने ही योजना राबवण्यास नकार दिल्याने ही योजना कृषी विभागाकडे कोणतेही अतिरिक्त मनुष्यबळ व सुविधा निर्माण न करता हस्तांतरित करण्यात आली. हस्तांतरणापूर्वी कृषी, महसूल मंत्री आणि संबंधित खात्यांचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेसे मनुष्यबळ व सुविधा कृषी विभागाला देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आश्वासनाची पूर्तता न करताच महसूल विभागाच्या दबावाखाली योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. योजना राबवताना येणाऱ्या अड्चणीचाबत संघटनेमार्फत पत्रव्यवहार करुनही अद्याप दखल घेण्यात आली नाही. पीएम किमानचा १७ वा हमा वितरित करण्यात आला आहे. या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गर्दी करत आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सदर योजनेसाठी स्वतंत्र प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शंका निरसन करता येत नाही. त्यामुळे दोन्ही योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 04/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow