Sunita Williams : थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद

Sep 14, 2024 - 12:05
 0
Sunita Williams : थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद

गेल्या 100 दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Astronauts Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पत्रकार परिषद घेतली.

भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री 12.15 वाजता ही पत्रकार परिषद पार पडली. सुनीता आणि बुच यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अमेरिकेच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार असल्याचे दोघांनी सांगितले.

अंतराळातून मतदान करण्याबद्दल उत्साहित

मतदानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बुच म्हणाले की, 'मतदानाशी संबंधित निवडणूक प्रक्रिया त्यांनी आजपासूनच सुरू केली आहे. हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपण मतदान कसे करू शकतो यावर नासा काम करत आहे. सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, अंतराळातून मतदान करण्याबद्दल उत्साहित आहे.

पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्पेस सेंटरमधून सुनीता आणि बुच यांनी सांगितले की त्यांनी नासाला अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. सुनीता आणि बुच यांनी 5 जून रोजी स्पेस स्टेशनवर उड्डाण केले. ते 6 जून रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचले. ते 13 जूनला परतणार होते. पण, नासाच्या बोईंग स्टारलाइनर यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले. आता दोघेही 2025 मध्येच परतण्याची शक्यता आहे.

सुनीता आणि विल्मोर काय म्हणाले?

स्टारलाइनर ISS सोडताना पाहून वाईट वाटल्याचे सुनीता म्हणाल्या. मात्र, अशा परिस्थितीत जगण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले आहे. त्या म्हणाल्या की, 'मला अंतराळात रहायला आवडते. हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. त्यांनी सांगितले की, ISS आनंदाचे ठिकाण आहे. गरज पडल्यास, आम्ही येथे 8 महिने, 9 किंवा 10 महिने राहू शकतो. पण, कुटुंब आणि पाळीव कुत्र्यांना मिस करत आहे. एकाच मोहिमेवर दोन वेगवेगळे अंतराळयान उडवण्यास उत्सुक असल्याचे सुनीताने सांगितले. बुच म्हणाले की, तो पहाटे साडेचार वाजता उठतो, तर सुनीता साडेसहा वाजता उठते. अंतराळात राहण्यामुळे हाडांची घनता कमी होण्यास सामोरे जाण्यासाठी दोघेही दोन तास व्यायाम करतात. बुच यांनी सांगितले की, स्टारलाइनरचा पहिला चाचणी पायलट म्हणून, याठिकाणी जास्त वेळ घालवावा लागेल अशी अपेक्षा नव्हती. तथापि, त्याच्या परत येण्यास विलंब होऊ शकेल अशा समस्या असू शकतात याची त्याला जाणीव होती. या व्यवसायात असे घडते.

स्टारलाइनर अंतराळयान पृथ्वीवर परतले

सुनीता आणि बुच यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळ यान तीन महिन्यांनंतर 7 सप्टेंबर रोजी सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले. त्याचे लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने झाले. नासाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून (ISS) वेगळे करण्यात आले. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 6 तास लागले. हे अमेरिकेतील न्यू मेक्सिकोच्या व्हाईट सॅन्ड स्पेस हार्बरमध्ये (वाळवंट) उतरले. बोइंग कंपनीने नासासाठी हे यान बनवले होते. अंतराळ यानामध्ये तांत्रिक समस्या आणि हेलियम वायूची गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. पण सुरक्षित परत येण्याबाबत अनेक शंका होत्या.

 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow