PM Kisan Yojana : 'नमो किसान'चे 2000 रुपये आज जमा होणार

Aug 21, 2024 - 13:46
 0
PM Kisan Yojana : 'नमो किसान'चे 2000 रुपये आज जमा होणार

मुंबई : राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाचवेळी जमा करण्यात आले असून त्यांतर आता शेतकऱ्यांसाठीही खुशखबर आहे. नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आज जमा होणार आहे.

त्यामुळे राज्यातल्या एकाच घरात आज एकूण 5000 हजार रुपये मिळणार आहेत. परळी येथे कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहे. एकूणच लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो. आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत.

अर्जातील माहिती पुन्हा एकदा तपासा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेला तपशील तपासणे आवश्यक आहे. अर्जामध्ये नाव, लिंग, आधार क्रमांक, खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा. तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने भरल्यास, तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेसंदर्भातील माहिती कुठे मिळेल?

योजनेशी संबंधित अपडेटसाठी किसन भाई अधिकृत साइट pmkisan.gov.in ची मदत घेऊ शकतात. शेतकरी बांधवही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी करू शकतात. शेतकरी बांधवांना काही अडचण येत असेल तर ते हेल्पलाइन क्रमांक 155261 ची मदत घेऊ शकतात. योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव 1800115526 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow