Basmati Rice : बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य हटवले

Sep 14, 2024 - 15:22
 0
Basmati Rice : बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य हटवले

नवी दिल्ली : बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, भारत सरकारने त्याच्या निर्यातीवरील फ्लोअर प्राइस काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी बासमती तांदळावर निर्यात मूल्य लावण्यात आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सध्या सुरू असलेल्या व्यापारविषयक चिंता आणि तांदळाची पुरेशी देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन, भारत सरकारने आता बासमती तांदळाच्या निर्यातीवरील फ्लोअर प्राइस पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर बासमती तांदळाची अवास्तव किंमत रोखण्यासाठी आणि निर्यात संबंधित पद्धतींमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी (APEDA) निर्यात करारांचे बारकाईने निरीक्षण करणार आहे. त्याचबरोबर या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना अपेडाला देण्यात आल्या आहेत.

गैर बासमती तांदळाची निर्यात रोखण्यासाठी...

देशांतर्गत तांदळाचा पुरवठा अंत्यत कमी होत आहे. दुसरीकडे गैर-बासमती तांदळाची होत असलेली निर्यात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये तांदळाचे 1,200 अमेरिकी डॉलर प्रति मेट्रिक टन (एमटी) एवढे किमान निर्यात मूल्य ठरविण्यात आले होते. त्यानंतर विविध व्यापारी संस्था आणि भागधारकांच्या निवेदनानंतर सरकारने ऑक्टोबर, 2023 मध्ये किमान निर्यात मूल्य 950 प्रति मेट्रिक टन केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow