Chandra Grahan 2024 : आज लागलं वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण

Sep 18, 2024 - 10:39
Sep 18, 2024 - 16:47
 0
Chandra Grahan 2024 : आज लागलं वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण

या वर्षातील सर्वात शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण (Chandra Grahan)भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीला म्हणजेच आज होणार आहे. आजपासून पितृपक्षाची (Pitru Paksha) देखील सुरुवात झाली आहे.

त्यामुळे पितृपक्षाच्या सुरुवातीला लागलेलं ग्रहण चांगले मानले जात नाही.

भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण आज सकाळी 06 वाजून 11 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 17 वाजेपर्यंत होतं. याचाच अर्थ हे ग्रहण साधारण 4 तासांपर्यंत होतं. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र, हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार, याला चांगलं मानलं जात नाही. याचं कारण म्हणजे सूर्य किंवा चंद्रावर या काळात राहूचं सावट असतं. यामुळे वातावरणात नकारात्मकता येते.यासाठीच ग्रहणकाळात आणि सूतक काळात कोणतंच शुभ कार्य करु नये. मात्र, यंदा लोक द्विधा मनस्थितीत आहेत. कारण ग्रहण काळात पितृ पक्ष प्रतिपदा श्राद्धाच्या दिवशी आहे.

मीन राशीत ग्रहण

हे चंद्रग्रहण मीन राशी आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात होणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र, तरीही या ग्रहणाचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. यासाठीच ग्रहणाच्या दुष्प्रभावांपासून वाचण्यासाठी चंद्र ग्रहण संपल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

चंद्र ग्रहणानंतर करा 'हे' काम

चंद्र ग्रहण झाल्यानंतर सर्वात आधी स्नान करणं गरजेचं आहे. तसेच, घरात गोमुत्र शिंपडा. यामुळे ग्रहणाची नकारात्मकता संपुष्टात येईल. त्यानंतर देवाची पूजा करा. तुमच्या सामर्थ्यानुसार, दान करा. आजपासून पितृपक्षाला देखील सुरुवात झाली आहे आणि पितृपक्षात दान करणं फार शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही ग्रहणानंतर दान करु शकता. तुम्ही अन्न, कपडे, धन-धान्य यांसारख्या गोष्टी दान करु शकता.

(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 18-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow