दाभोळ ग्रामस्थांची 'महावितरण'वर धडक

Jul 12, 2024 - 11:04
Jul 12, 2024 - 13:48
 0
दाभोळ ग्रामस्थांची 'महावितरण'वर धडक

दापोली : दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांचे समवेत दाभोळ ग्रामस्थांनी दापोलीतील महावितरण कार्यालयात धडक दिली. वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा या वेळी देण्यात आला. दाभोळमध्ये सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, वीज खंडीत होणार महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.

यावेळी मागाठाणे विभाग संघटक चित्तरंजन देवकर, ज्येष्ठ शिवसैनिक संदेश तोडणकर, विभाग प्रमुख संतोष गुटेकर उपविभाग प्रमुख रवींद्र साळवी, मुरलीधर कनगुटकर, नाना शिगवण, गणेश कर्देकर, रोहिदास नरवेकर, रमेश जाधव, संदीप पवार उपस्थितीत होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow