दापोली कृषी महाविद्यालयाकडून किन्हळमध्ये आंब्यांच्या वाणांचे प्रदर्शन

Jul 12, 2024 - 11:41
Jul 12, 2024 - 14:42
 0
दापोली कृषी महाविद्यालयाकडून किन्हळमध्ये आंब्यांच्या वाणांचे प्रदर्शन

हर्णे : दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थिनीच्या मृदगंध गटाने दापोली तालुक्यातील किन्हळ गावात खांणजाईदेवी मंदिरात आंब्यांच्या विविध देशी व परदेशी जातीचे प्रदर्शन आयोजित केले होते.

प्रदर्शनात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत विकसित केलेल्या कोकण राजा, सिंधू, रत्ना आणि याबरोबरच काही देशी आणि विदेशी वाणांचा समावेश करण्यात आला होता. या प्रदर्शनावेळी विद्यार्थिनींनी विविध आंब्यांच्या वाणांची मुख्य गुणवैशिष्ट्ये समजावून सांगितली.

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी किन्हळ मावात दाखल झाल्या असून, पुढील १९ आठवडे गावात राहून शेती आणि त्या संबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर विविध विस्तार शिक्षणपद्धतींचा वापर करून तंत्रज्ञान प्रसाराचे काम करणार आहेत. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी संपर्क शेतकरी प्रशांत चिपटे आणि इतर सर्व ग्रामस्थांनी मदत केली. प्रदर्शनासाठी किन्हळ गावातील ४९ शेतकरी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

कल्याणी आगवणे, वेदिका भोळे, त्रिवेणी जाधव, जान्हवी कारंडे, मृणाल मेटील, सिमंतीनी पाटील, मेधावी शिंदे, निष्ठा कुवेसकर, निकिता पिलाने या कृषिकन्यांनी सहभाग घेतला होता. कोकण राजा, सिंधू, रत्ना आणि याबरोबरच काही देशी आणि विदेशी वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्याची माहिती व गुणवैशिष्ठ्ये शेतकऱ्यांना समजून घेता आली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow