शिक्षणाच्या अभावामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ : प्रा. सचिन सनगरे

Jul 13, 2024 - 12:24
Jul 13, 2024 - 15:25
 0
शिक्षणाच्या अभावामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ : प्रा. सचिन सनगरे

रत्नागिरी : लोकसंख्या ही कोणत्याही देशाची संपत्ती असते; मात्र वाढती लोकसंख्या ही नियोजनबद्ध असेल तर ती ताकद असते आणि याचा नकारात्मक विचार केला तर ती समाजाला पोखरू शकते. त्यामुळे संख्या वाढवण्यापेक्षा सक्षम, कार्यात्मक लोकसंख्या वाढवणे गरजेचे आहे. कार्यात्मक लोकसंख्येचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिसून येतो शिक्षणाच्या अभावामुळे लोकसंख्या वाढत असून, शिक्षणप्रणाली सक्षम असणेही तितकीच गरजेची आहे. कारण शिक्षण आणि विकासरावर खर्च होण्यापेक्षा लोकसंख्या नियंत्रण, सुविधा, पर्याय यावरच आपली ताकद वाया जात आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा. सचिन सनगरे यांनी मार्गदर्शन केले.

नवनिर्माण शिक्षणसंस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा अर्थशासा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएम) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित ते बोलत होते. यावेळी एस. पी. हेगशेटे महाविद्यालपाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कला शाखाप्रमुख हाँ पूजा मोहिते, अर्थशात विभागप्रमुख प्रा. वर्षा कुबल, मराठी विभागप्रमुख प्रा. सचिन गिजबिले, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सनगरे म्हणाले, अनेक देशांची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे: परंतु ते भारताच्या पुढे आहेत कारण, तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी
करण्याऐवजी ते शोषण करत आहेत. या प्रसंगी प्राचार्य डॉ. जगदाळे म्हणाल्या, आपत्ती कार्यक्षमता देशाच्या आर्थिक विकासासाठी वापरली पाहिजे. तरुण पिढीने जार्थिक व्यवस्थेत योगदान देणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढत असली तरीही संसाधने मर्यादित आहेत. त्यांच्या सुयोग्य वापरासाठी लोकसंख्या नियंत्रित करणे आवश्यक आाहे. या लोकसंख्येचा वापर प्रत्येक क्षेत्राचा विकास करून आर्थिक विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी केला पाहिजे यावेळी भितीपत्रकाचे अनावरण करण्यात आहे एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वर्षा कुबल यांनी प्रास्ताविक तर प्रा. उमेरा काद्री यांनी आभार मानले.

निबंध व पोस्टर स्पर्धेचा निकाल
कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालपातील मुलांसाठी निबंध आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल अशा वरिष्ठ महाविद्यालय, निबंध स्पर्धा आर्या सनगरे (प्रथम), स्नेहल सूर्यराण (द्वितीय), सानिका पेजे पोस्टर स्पर्धा स्नेहल सूर्यराव (प्रथम), हसन कापडे (द्वितीय), मेहेक गडकरी (तृतीय), कनिष्ठ महाविद्यालय, निबंध स्पर्धा (मराठी माध्यम) नेहल भुजबळराव (प्रथम), हाजरा बारे (डितीय), रसिका सनगरे (तृतीय), इंग्रजी माध्यम-हिना सोलाकर (प्रथम), सानिया तांबे (द्वितीय), झिका अलवारी, पोस्टर स्पर्धा अन्वीषा मठपती, (प्रथम), मारिया कुंभये (द्वितीय), रहिना बारगीर (तृतीय), या स्पर्वेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow