स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत 15 जुलै रोजी स्वरूप ठेव मानांकन दिवस : ॲड. दीपक पटवर्धन

Jul 15, 2024 - 10:39
Jul 15, 2024 - 10:43
 0
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत 15 जुलै रोजी स्वरूप ठेव मानांकन दिवस : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी  : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृद्धी मास अंतिम टप्प्यात आहे. ठेव वृद्धीमासाचे केवळ 5दिवस बाकी आहेत. 20 जूनपासून 14 जुलैपर्यंत 11 कोटी 11 लाख रुपयांच्या नवीन ठेवी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत जमा झाल्या आहेत. संस्थेच्या ठेव वृद्धी उत्सवात ठेवीदार आनंदाने आणि उत्साहाने सहभाग देत आहेत. संस्थेकडे एकूण 22000 च्या घरात ठेव खाती आहेत. ठेव खात्यांची ही संख्या 25 हजारपर्यंत नेण्याचा संकल्प घेऊन त्याचा शुभारंभ करावा म्हणून स्वरूप ठेव मानांकन उपक्रम राबवत असल्याची माहिती संस्थाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्वरूप ठेव मानांकन दिवसाचा शुभारंभ करण्यासाठी उद्या दि. 15 जुलै रोजी किमान 100 नवे ठेवीदार संस्थेबरोबर जोडण्याचा संकल्प करून प्रत्येक शाखेला उद्दिष्ट देण्यात आले आहे. संस्थेचे अधिकारी, कर्मचारी पिग्मी प्रतिनिधी स्वरूप ठेव मानांकन उद्दिष्ट गाठण्यासाठी संपर्क करत आहेत. या नव्या संपर्क संवाद उपक्रमातून 15 जुलै रोजी किमान 100 नवे ठेवीदार संस्थेजवळ जोडले जावेत, असा हा उपक्रम राहणार आहे. या नव्या ठेववृद्धी मासात आजपर्यंत 675 ठेवीदारांनी पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये नवीन गुंतवणूक केली आहे. योजनेच्या समाप्तीपर्यंत हा आकडा 1000 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे.

ठेवीदारांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये आपली अमूल्य ठेव गुंतवून आकर्षक व्याजदराचा तसेच सुरक्षित ठेव गुंतवणुकीचा आनंद घ्यावा व निर्धास्त व्हावे, असे आवाहन करताना गुंतवणुकदारांनी दि. 15 जुलै मोठ्या प्रमाणावर रोजी गुंतवणूक करावी, असे विनम्र आग्रही आवाहन संस्थाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow