Maharashtra Cabinet Meeting : अर्थसंकल्पानंतर राज्य सरकारचे 6 महत्त्वाचे निर्णय!

Jul 23, 2024 - 17:25
 0
Maharashtra Cabinet Meeting : अर्थसंकल्पानंतर राज्य सरकारचे 6 महत्त्वाचे निर्णय!

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या (Shinde-Fadnavis-Pawar Government) राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाखांची मदत देणार आहे. 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  • राजे यशवंतराव होळकर महामेष" योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार (पशुसंवर्धन विभाग)
  • आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाख (सार्वजनिक आरोग्य) : राज्यातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखांची मदत तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखांची मदत राज्य सरकार करणार आहे, अशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदनाच्या संदर्भातला हा महत्वाचा निर्णय आहे. राज्यात एकुण 75 हजार 568 आशा स्वयंसेवीका कार्यरत आहेत.
  • शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार (मदत व पुनर्वसन विभाग)
  • दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठीआरक्षण धोरण ( सामान्य प्रशासन)
  • बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावर ( सामान्य प्रशासन)
  • अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन ( महसूल विभाग)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow