संगमेश्वर : फुणगूस मार्गावरील खड्डा धोकादायक

Jul 29, 2024 - 12:06
Jul 29, 2024 - 16:09
 0
संगमेश्वर : फुणगूस मार्गावरील खड्डा धोकादायक

संगमेश्वर : तालुक्यातील फुणगुस मार्गावर कोंड आंबेड कुणबी भवनासमोर मोठा खड्डा पडला असून त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. संगमेश्वर-डिंगणी मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मुंबई गोवा महामार्गावरून गणपतीपुळेकडे जाणारे पर्यटक याच मार्गाचा अवलंब करतात. डिंगणी येथील सीएनजी स्टेशनवरुन गॅसची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. यावर्षी मे महिन्याच्या प्रारंभी डिंगणी रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतू या मार्गावरील कोंड आंबेड येथे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तातडीने हा खड्डा भरावा, अशी मागणी वाहन चालकांनी आणि पादचाऱ्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow