Ratnagiri : जिल्ह्यात धान्य वितरण तांत्रिक दोषामुळे ठप्प

Jul 29, 2024 - 12:22
Jul 29, 2024 - 16:25
 0
Ratnagiri : जिल्ह्यात धान्य वितरण तांत्रिक दोषामुळे ठप्प

रत्नागिरी : जिल्ह्यात ऑफलाईन धान्य वाटपास केंद्र शासनाने परवानगी नाकारली आहे. राज्यात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे जुलै महिन्यातील धान्य वितरण थांबले आहे. तरी जिल्हा पुरवठा विभागाच्या पाठपुराव्यामुळे ५० टक्के धान्य वाटप झाले आहे. गेल्या तीन आठवडयांपासून हा तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार ऑफलाईन धान्य वाटप करण्यास परवानगी नाही. ऑफलाईन धान्य वाटप केल्यास केंद्र शासनाकडून मार्जिनच्या रकमेची व इतर खर्चाची प्रतिपूर्ती मिळत नाही तसेच केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, यामुळे कॅरी फॉरवर्ड सुविधेसाठी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता केंद्र शासनास पत्र पाठवण्यात आले आहे व धान्य वाटपास मुदतवाढ देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे तसेच यांत्रिक अडचणी दूर करण्यारयठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील पुरवठा विभागाने केले आहे. 

प्राधान्यातीत लाभार्थी १ लाख ४२ हजार 
प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी १ लाख ४२ हजार ४२ आहेत. त्यांना ८९२.५२० मेट्रिक टन गहू उचलण्यात आला. त्यापैकी ५४२.५९३ टन वितरण झाले असून, ८४९.९२७ टन गव्हाचे वाटप शिल्लक आहे. ३६४५.८६ मेट्रिक टन तांदूळ उचलला असून २९६२.३९४ टन वितरित झाले असून, १४८३.४६६ टन तांदूळ शिल्लक आहे. तांत्रिक दोष लवकर दूर करण्यासाठी युद्धपातळीकर काम सुरू आहे; परंतु जिल्हात या अडचणीमुळे धान्य वाटप थांबले आहे.

अंत्योदय कार्डधारक ३९ हजार २५५
जिल्ह्यात एकूण ३९ हजार २५५ अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये ३५५.०२० मेट्रिक टन गहू उचलला असून २२०.९४७ मेट्रिक टन वितरित झाला असून, १३४.०७३ मेट्रिक टन शिल्लक आहे, तर ८९४.९८९ तांदूळ उचलला असून, ५५२.५६१ मेट्रिक टन वितरित झाला आहे. ३४२.४२८ टन तांदूळ शिल्लक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow