समाजात चांगला माणूस निर्माण व्हावा : न्यायाधीश पी. व्ही. कपाडिया

Aug 1, 2024 - 11:08
Aug 1, 2024 - 16:38
 0
समाजात चांगला माणूस निर्माण व्हावा : न्यायाधीश पी. व्ही. कपाडिया

गुहागर : धर्म कुठलाही असो. चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी हिशेब आपल्या चांगल्या कर्माचा होतो, धर्माचा नाही. कायद्यापेक्षा आधुनिक समाजात चांगला माणूस निर्माण करण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असल्याचे न्यायाधीश पी. व्ही. कपाडिया यांनी व्यक्त केले.

तालुका विधी सेवा समिती गुहागर, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातर्फे कायदेविषयक कार्यशाळा गुरुवार दि. २५ रोजी सकाळी गुहागरमध्ये झाली. कार्यशाळेला गुहागर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही कपाडिया, अॅड. मनाली आरेकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम. आर. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद कांबळे, प्रा. रश्मी आडेकर उपस्थित होत्या. यावेळी न्यायाधीश पी. व्ही. कपाडिया यांनी पोस्को कायद्याची गरज का निर्माण झाल्याचे सांगितले. मुलगी वाचवा व मुलगी शिकवा या विषयावर अॅड. मनाली आरेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्तविक कार्यक्रमाधिकारी डॉ. आनंद कांबळे व प्रा. रश्मी आडेकर यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी गुहागर न्यायालयातून राजेश चिपळूणकर, सरकुंडे व खेरटकर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:36 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow