चिपळूण : परशुराम येथील वृद्धाश्रमाचे उद्घाटन

Aug 7, 2024 - 10:04
Aug 7, 2024 - 10:31
 0
चिपळूण : परशुराम येथील वृद्धाश्रमाचे उद्घाटन

चिपळूण : श्री परशुराम मंदिर परिसरातील नूतन वृद्धाश्रम इमारतीचा उद्घाटन सोहळा परशुराम गावात उत्साहात झाला. मुंबई येथील कुटुंब सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेने हे वृद्धाश्रम चालवायला घेतले आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते वृद्धाश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थानचे अध्यक्ष जीवन रेळेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, विश्वस्त डॉ. अभय सहस्रबुद्धे, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा गौरीताई रेळेकर, परशुराम हॉस्पिटलचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुपम अल्मान, आरती निराधार फाउंडेशनचे नारकर, सीए विवेक रेळेकर, उमेश खताते, कुटुंब सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष संदीप थत्ते, सचिव प्रमोद पेडणेकर, खजिनदार संकेत पेडणेकर, विश्वस्त सुरेश फापाळे, आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow