Vinesh Phogat Disqualified From Paris Olympic 2024: जी शंका होती तेच झालं, विनेश फोगाटविरोधात सरकारचा हा सर्वात मोठा कट; सासऱ्यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : भारताच्या (Team India) ऑलिम्पिक (Olympic 2024) मोहिमेला मोठा धक्का बसला असून ऑलिम्पिकची फायनल (Olympic Final) गाठलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अपात्र ठरवण्यात आलं.
विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांनी एका वृत्त वाहिनीशी बातचित केली. ते म्हणाले की, 100 ग्रॅम वजन किती जास्त असतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅम वजन वाढू शकतं. याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि ब्रीजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
राजपाल राठी म्हणाले की, "ही हृदयद्रावक बातमी असून त्यावर राजकारण केलं जात आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर काढतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅमपर्यंत वजन वाढतं. सपोर्ट स्टाफनं कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही.
ते पुढे म्हणाले, "मी अद्याप विनेश फोगटशी बोललो नाही. माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचं विनेशनं वारंवार सांगितलं होतं. फोगटनं जयपूर आणि इतर ठिकाणी अनेकदा हे वक्तव्य केलं आहे. फोगटला अपात्र ठरवल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत. होय. काल ज्यावेळी मॅच झाली, त्यावेळी वजन का वाढलं नाही?"
या निर्णयाच्या विरोधात त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. विनेश फोगटच्या अपात्रतेचे ते कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?
विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 07-08-2024
What's Your Reaction?