मंडणगडातील पुल वाहतूकीसाठी बंद; तीन गावांना फटका, विद्यार्थ्यांचे हाल

Aug 9, 2024 - 09:54
Aug 9, 2024 - 10:08
 0
मंडणगडातील पुल वाहतूकीसाठी बंद; तीन गावांना फटका, विद्यार्थ्यांचे हाल

मंडणगड : मंडणगड गांधी चौक येथील अडखळ, कोंझर, टाकवली या तीन गावांत शहरास जोडणारा पूल गेल्या महिन्यापासून मोठ्या व अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आल्याने त्यांचा फटका तीन गावांना बसत आहे. एसटी वाहतूक थांबल्याने या गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.

या मार्गावर सुरू असणारी मंडणगड टाफवली गाड़ी आगाराने बंद केल्याने या तीन गावांतील विद्यार्थ्यांना पायी चालत प्रवास करून मंडणगड गाठावे लागत आहे. टाकवलीतील विद्यार्थ्यांचे शाळेत येणे व परत घरी जाणे हे अंतर दिवसाला १६ किलोमीटरइतके आहे. पुल वाहतुकीसाठी बंद झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यश-अपयशागर मोठी चर्चा झाली ती अद्यापही सुरु आहे. पूल पुचणे हे निसर्गनिर्मिती संकट की, धोकादायका पूल अशा अहवाल कळूनही निधीअभावी त्याकडे लक्ष न देणारी नगरपंचायत यास जबाबदार आहे. यावरही आरोप प्रत्याहपांच्या फैरी झडत आहेत.
 
घटनेनंतर सत्ताधारी व यंत्रणा समस्येचे उत्तर नसल्याने सैरभर झाल्याचे दिसत असताना विरोधकांनी पुलासाठी निधी मिळवून आणल्याचे दावे केले. निधी मंजूर होणे, कामाचे एस्टिमेट होणे, त्याची निविदा निघणे, ठेकेदार नियुक्त होणे प्रत्यक्ष कामास सुरवात होणणे व त्यानंतर विहित मुदतीत काम पूर्ण होणे ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे अतिशय वेळकाढू काम आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन अडखळ टाकवली गावांना पर्यायी सुर्ले गावातील रस्त्याने वाहतूक सुरू करता येईल का, या पर्यायाचा अभ्यासही या कालावधीत स्थानिक ग्रामस्थांनी झाडी साफ करून रस्ता सुस्थितीत आणला, पण या मार्गावर धावलेली गाडी मुलें गावच्या हद्दीच्या पलीकडे गेलीच नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहतुकीची अपेक्षा संपलेली आहे. टाकवली गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी हवालदिल आहेत. विद्यार्थ्यांची पायपीट थांबण्यासाठी प्रश्न सोडवण्याची शक्यता असलेल्या सर्वच ठिकाणी आपले जोडे झिजवत आहेत. अचानक आलेल्या समस्येतून गावाची सुटका कधी होणार, तालुक्याच्या विकासाची घोषणा करणारे सर्वच आता नेमके कोठे आहेत, असा मन ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या कालावधीत नगरपंचायतीने फुलाच्या बाजूने भराव टाकून त्याला मजबुतीकरण करण्याचे काम सुरू केले आहे; मात्र अद्याप समस्येची तीव्रता कमी करून वाहतूक पूर्ववत झालेली नाही.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow