Ratnagiri : जि.प.ला मिळाले ३७७ नवे शिक्षक

Aug 9, 2024 - 10:03
 0
Ratnagiri : जि.प.ला मिळाले ३७७ नवे शिक्षक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदला पुन्हा नव्याने ३७७ शिक्षक मिळाले आहेत. गुरुवारी समुपदेशनाद्वारे या शिक्षकांना शाळा देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवे शिक्षक मिळाल्याने आता फक्त ६४७ पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली आहे. हे गेल्या चार पाच वर्षात दिसत आहे. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेमध्ये रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वळ ठरला होता. मात्र रिक्त पदांची संख्या वाढत निघाल्याने शैक्षणिक कारभार चालवताना जि. प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास २ हजार पदे रिक्त होती. शासनाने १ हजार पदे भरण्यास मंजुरी दिली होती.

त्यानुसार मे महिन्यात ९९७ शिक्षकांची भरती झाली. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाला दिलासा मिळाला होता. ही भरती झालेली असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मराठी माध्यमासाठी ३४७ व उर्दू माध्यमासाठी ३० असे एकूण ३७७ शिक्षक पवित्र पोर्टलमधून भरण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

गुरुवारी या शिक्षकांचे समुपदेशन जि.प.च्या श्यामराव पेजे सभागृहात झाले. ३७७ जणांना शाळा देऊन शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, शिक्षण अधिकारी वी. एम. कासार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विजयसिंह जाधव, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव आदी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात या शिक्षकांची कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली. नवीन शिक्षक शुक्रवारपासून शाळेवर रुजू होणार आहेत. यामुळे आता शिक्षकांच्या संख्येमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow