संगमेश्वर : आरवली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी रानभाजी प्रदर्शन

Aug 12, 2024 - 10:13
Aug 12, 2024 - 16:13
 0
संगमेश्वर : आरवली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी रानभाजी प्रदर्शन

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील श्रीदेव केदारनाथ विद्यामंदिर आरवलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी रानभाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सदस्य चैतन्य परकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य राजन पिलणकर उपस्थित होते. आरवली केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी या प्रदर्शनाची भेट घेतली. इयत्ता आठवी, नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात्त मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये निसर्गतः उगवलेल्या व उपलब्ध असलेल्या भारंगी, टाकळा, आकुर, अळू, पाथरी, सुरण पाने, शेगल सुरणाचा कांदा, गोमेटा, ढोमळा, कुर्डू, केळफूल, कवळा आदी रान भाज्यांचे प्रदर्शन मांडले. यावेळी संस्थेचे सदस्य राजन पिलणकर यांनी मार्गदर्शन केले. रानभाज्या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देवयानी फणसे ग्रुप व श्रद्धा गुरव ग्रुप, द्वितीय क्रमांक जय जाबरे ग्रुप व अनुष्का बाटे ग्रुप, तृतीय क्रमांक श्रुती फणसे ग्रुप व संस्कृती खोचाडे ग्रुप असे विभागून देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ सुजल बाटे ग्रुप यांना देण्यात आला. या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोथले यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल सरनोबत यांनी केले. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वरूपा कनगुटकर यांनी मार्गदर्शन केले तर आभार विजया चोरगे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow