एकनाथ शिंदे देशातील सर्वात लोचट मुख्यमंत्री : संजय राऊत

Aug 14, 2024 - 11:30
 0
एकनाथ शिंदे देशातील सर्वात लोचट मुख्यमंत्री : संजय राऊत

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हतं. असे म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'मुख्यमंत्री लोचट मजनू' अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) केलीये.

मुख्यमंत्री काल एका सभेत ताई माई अक्का सावत्र भावांना मारा बुक्का असे म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात कोणी सावत्र नाही सावत्र दिल्लीत बसलेत. असं राऊत म्हणाले.

लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय

मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत. असे खासदार संजय राऊत म्हणाले.

सावत्र महाराष्ट्रात नाही दिल्लीत बसलेत : संजय राऊत

या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही. सावत्र आहेत ते दिल्लीत बसलेत. मोदी आणि शहा हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देतात. महाराष्ट्राचा सावत्र नाही भाऊच नाहीत ते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी अमित शहा यांनी जेवढे महाराष्ट्राचे नुकसान केलं तेवढं 100 वर्षात कुणी केलं नाही.
मुख्यमंत्री काल एका सभेत ताई माई अक्का सावत्र भावांना मारा बुक का असे म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीच्या रकमेत भरघोस वाढ करू

सरकारी तिजोरीतून पैशांची उधळपट्टी केली. लाडक्या बहिणींना पैसे मिळायलाच हवे. पण पंधराशेच्या आकड्यात आमचं सरकार आल्यावर भरघोस वाढ होईल. लोकसभा निवडणूक झाली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हतं. कुठे देण्यात आले एकेक आमदाराला 50 -50 कोटी देण्यात आले. काही जणांना शंभर शंभर कोटी देण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात येतात. पण लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये, अशी जोरदार टीका राऊतांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं

महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. सत्तांतरासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार बनवायचं. पैसा आणि सत्य समोर महाराष्ट्र झुकला जाणार नाही हे आम्ही लोकसभेत दाखवून दिलं.

नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातोय

पोलीस यंत्रणेचा धाक दाखवून पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा. उदाहरणार्थ नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातोय. कारण ते मोदीशहाच्या तुरुंगाच्या भिंती फोडून आले. पन्नास खोकला विकले गेले नाहीत. तुमचा हिशोब द्या असा सवाल संजय राऊत यांनी केला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow