गुहागरात दरड कोसळली

Aug 26, 2024 - 10:44
Aug 26, 2024 - 10:51
 0
गुहागरात दरड कोसळली

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पाठ फिरवलेल्या व गुरुवारपासून सक्रिय झालेल्या पावसाने शनिवारी सातत्य राखले. पावसाअभावी कोरड्या पडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस वाढून त्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सरासरी वाटचाल पूर्ण केली आहे. दरम्यान, पुढील चार दिवस रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. गुहागर तालुक्यात पावसामुळे घरावर दरड कोसळून नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र दहीहंडीपर्यंत म्हणजे मंगळवारपर्यंत जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे श्रावण महिन्यातील पावसाचे दिवस कोरडे जात होते. शुक्रवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या; मात्र आता पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आगामी दिवसात रत्नागिरीसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, संपूर्ण जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. कोकण किनारपट्टी भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. जोरदार सरी बरसल्याने धरणांमधील पाणीसाठयात समाधानकारक वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेती धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यात भीती निर्माण झाली होती; मात्र पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने खरीप लागवड क्षेत्रात दिलासा मिळाला. काही भागात भात शेती कोरडी पडली होती; मात्र, पाऊस सक्रिय झाल्याने येथील पिकस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय निकषान्वये सरासरी ३३६४ मि.मी. पाऊस दरवर्षी पडतो. जिल्ह्यात आतापर्यंत ३३६४ मि.मी.च्या सरासरीने एकूण ३० हजार १५९ मि. मी. एकूण पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात पावसाने १०० टक्के वाटचाल पुर्ण केली आहे. गतवर्षी याच कालावधीत २४३४ मि. मी. च्या सरासरीने ७२ टक्के इतकी मजल मारली होती. गत वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत पवासने २८ टक्के जादा मजल मारली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow