''लाडक्या बहिणींनो पैसे घ्या, फडणवीसांनी नागपूरची प्लॉटिंग, वा जमिन विकून पैसे दिले नाहीत' : मनोज जरांगे

Aug 28, 2024 - 14:30
 0
''लाडक्या बहिणींनो पैसे घ्या, फडणवीसांनी नागपूरची प्लॉटिंग, वा जमिन विकून पैसे दिले नाहीत' : मनोज जरांगे

बीड : लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojna) सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यंमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सरकारने सध्या लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजना चांगली आहे. योजनेचे फॉर्म भरा, पैसेही घ्या.. पैसे आपलेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय त्यांची नागपूरची प्लॉटिंग किंवा जमिनी विकून आपल्याला पैसे दिले नाहीत, असे मनोज जरांगे म्हणाले. ते बीडमध्ये बोलत होते. बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा गावात मनोज जरांगेंचं जेसीबीतून फुलं उधळत स्वागत करण्यात आल. यावेळी तांदळा गावकऱ्यांकडून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते.

मनोज जरांगे म्हणाले, लाडकी बहीण योजना चांगली आहे. योजनेचे फॉर्म भरा, पैसेही घ्या.. पैसे आपलेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय त्यांची नागपूरची प्लॉटिंग किंवा जमिनी विकून आपल्याला पैसे दिले नाहीत किंवा देत नाहीत. हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे. जनतेच्या करामधून आणि जीएसटी इन्कम टॅक्स आणि शेतकऱ्यांच्या टॅक्समधून गोळा केलेला पैसा आपलाच आहे. तोच पैसा आपल्याला परत करत आहेत. राज्याच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली मात्र बहिणीच्या लेकरांचं काय? लाडक्या भाषेच्या आरक्षणाचे काय हे देखील सरकार सांगावं? तसेच लाडकी बहीण योजना आणली मात्र लाडक्या बहिणीच्या मेव्हण्याच्या शेतीच्या भावाचं काय?

येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचा हिशोब चुकता करणार : मनोज जरांगे

देवेंद्र फडणवीस तुमचा हिशोब चुकता करणार आहे. आमचे लेकरं जेलमध्ये घातले वेळ हातात आल्यावर हिशोब चुकता करीन म्हटलं की करीन हा माझा शब्द आहे असे थेट मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हानच दिले आहे. मी त्यांना सरळ करणार आहे. वेळ आणि काळ सोबत असायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचा हिशोब चुकता करणार आहे असे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ज्या ज्या लोकांनी आम्हाला अडचणी आणण्याचे काम केलं आहे. त्यांचा हिशोब येणाऱ्या काळात पूर्ण करणार आहे. रेकॉर्ड शोधणे बंद केला आहे हे संपूर्ण कटकारस्थान देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत असल्याचे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. भांडण लावण्याचे काम सध्याला देवेंद्र फडणवीस करत आहेत, असेही जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस भांडण लावण्याचे काम करतात : मनोज जरांगे

ज्या ज्या लोकांनी आम्हाला अडचणी जाण्याचे काम केलं आहे त्यांचा हिशोब येणाऱ्या काळात पूर्ण करणार आहे. रेकॉर्ड शोधणे बंद केला आहे. हे संपूर्ण कटकारस्थान देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत असल्याचे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. भांडण लावण्याचे काम सध्याला देवेंद्र फडणवीस करत आहेत. मराठा समाजाचे हैदराबादला साडेतीन हजार कुणबी नोंदीचे रेकॉर्ड सापडले असून त्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणीने गेल्या अनेक दिवसापासून करत आहे. हे रेकॉर्ड सापडल्याची कबुली मंत्री शंभूराजे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र हे होऊ नये असे देवेंद्र फडणवीस यांना वाटत असल्याचे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow