चिपळुणात आज ७५ फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण

Aug 29, 2024 - 09:57
 0
चिपळुणात आज ७५ फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण

चिपळूण : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या ७५ फुटी ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी ११.३० वा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. 

बुरुमतळी येथे नगरपरिषदेच्या दूरदर्शन केंद्र इमारत परिसरात गतवर्षी या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध ठिकाणी अशा प्रकारचे उत्तुंग ध्वजस्तंभ उभारण्यात आले. यावेळी माजी सैनिक व सैन्यामध्ये विशेष कामगिरी केलेल्यांचा सन्मान केला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow