वांद्री येथे शाळकरी मुलींशी शिक्षकाचे अश्लील चाळे

Aug 31, 2024 - 11:30
 0
वांद्री येथे शाळकरी मुलींशी शिक्षकाचे अश्लील चाळे

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे शाळकरी मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी जाब विचारत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्री येथील प्राथमिक शाळेत पाचवी, सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत शाळेतील शिक्षक अश्लील चाळे करत होता. पाचवी, सहावीतील मुलींशी तो अश्लील कृत्य करत होता. या मुलींनी सारा प्रकार घरी सांगितला.

संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी तातडीची पालक सभा लावली आणि संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकाला जाब विचारण्यास सुरूवात केली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हि बातमी वाऱ्यासारखी पसरताच अन्य ग्रामस्थांनी सायंकाळी शाळेवर धडक दिली. शिक्षकाला जाब विचारला. वातावरण चिघळताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने डिवायएसपीसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत शिक्षकाला ताब्यात घेतले. संगमेश्वर पोलिसांनी त्याला ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी संगमेश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow