गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांकडून महामार्गाची पाहणी

Sep 5, 2024 - 14:13
Sep 5, 2024 - 14:16
 0
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांकडून महामार्गाची पाहणी

लांजा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली लांजा पोलिसांनी आंजणारी ते वाटूळ या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी गावी दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची गैरसोय ही चाकरमान्याचे होऊ नये, गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, ट्रॅफिक जाम, अपघात यासारखे प्रकार घडू नयेत या दृष्टीने खबरदारीचा आपल्या उपाय म्हणून लांजा उपअधीक्षक यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी आंजणारी ते वाटुळदरम्यान मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, लांजा नगरपंचायत आणि वाहतूक शाखा यांचे कर्मचारी, सहभागी होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow