गणेशोत्सवामुळे फुलांचे दर दुपटीने वाढले, उत्पादनात घट

Sep 9, 2024 - 11:18
Sep 9, 2024 - 15:48
 0
गणेशोत्सवामुळे फुलांचे दर दुपटीने वाढले, उत्पादनात घट

मिरज : गणेशोत्सवासाठी फुलांना मागणी असल्याने बाजारात फुलांची चांगली आवक आहे. मागणीमुळे फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. फुलांचा दर तेजीत असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवासाठी फुलांना चांगली मागणी असल्याने निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांनाही मोठी मागणी असल्याने मिरजेतील बाजारात दर दुपटीने वाढले आहेत.

मोठ्या आकारांची मूर्तीं असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांसह, घरगुती गणपतींच्या पूजेसाठी विविध प्रकारच्या फुलांना व फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे.

यावर्षी पावसाळ्यात पाऊस जास्त असल्याने फुले मोठ्या प्रमाणात खराब होऊन फुलांचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. गणेशोत्सवात दर तेजीत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 09-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow