दीपिका-रणवीरला कन्यारत्न!

Sep 10, 2024 - 11:44
 0
दीपिका-रणवीरला कन्यारत्न!

भिनेत्री दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर सिंह आई-बाबा बनले. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका-रणवीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते.

त्यानंतर शनिवारी तिला एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी 9 सप्टेंबर रोजी दीपिकाने चाहत्यांना 'गोड बातमी' सांगितली. सोमवारी रणवीरची बहीण रितिका भवनानी तिच्या भाचीला पाहण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसली होती.  

दरम्यान, रणवीर-दीपिकाच्या चिमुकल्या मुलीला भेटण्यासाठी मुकेश अंबानी रुग्णालयात पोहोचले आहेत. अत्यंत कडक सुरक्षेत त्यांची कार रुग्णालयाच्या ठिकाणी पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर आणि दीपिका यांचं अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला रणवीर आणि दीपिका आवर्जून उपस्थित होते. लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांनाही दोघांनी हजेरी लावली होती. दीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, ते रुग्णालयसुद्धा मुकेश आणि नीता अंबानी यांचं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow